Wai@ Glance
वाई ला भेट द्यायचीच होती ,नद्यांचं आणि घाटा चं मला जन्मजात आकर्षण . नदीकाठी जन्म झाल्यामुळे ती संस्कृती माझ्या आतच भिनलेली ,तिला सोबत घेऊनच ,तिच्या शोधात फिरत असते. आशुतोष गोवारीकर च्या स्वदेस मधील तो भव्य घाट लोभावणारा होता ही ,आशुतोष गोवारीकर ,प्रकाश झा ,रोहित शेट्टी ,इ अनेक चित्रपट दिग्दर्शकांना ही वाई चं आकर्षण वाटलेलं आहे . भल्या पहाटे हातात फक्त iphone आणि मनात नदीचं प्रेम घेऊन ते सगळं शोधत निघाले . माझं गंगाखेड्च पुन्हा नव्याने जुनं होऊनच भेटल्याचा प्रत्यय आला . तशीच जुनी आळी ,तशीच जुन्याचा अंश घेऊन नवी होऊ पाहणारी घरं आणि लफंगे गली कुचे . भव्यता लाभलेलं सुंदर गणपती मंदीर ,तो घाट ,गंगापुरी घाट ,समोर पसरलेलं पाणी ,पण नंतर भ्रमनिरास होतो ,तिथे कपडे धुणारी लोकं बघून ,ते या सगळ्या मनातल्या फ्रेम्स ची वाट लावतात . मला गंगाखेड चा घाट याहून कितीतरी मोठा आणि प्रचंड फोटोजेनिक वाटला ,तिथे अजून कुणाचे कसे लक्ष गेले नाही ?गंगाखेड ला नृसिंह देवाचे घाटावर मंदिर आहे ,नृसिन्हाला गावात प्रेमाने नरषा म्हणतात ,नरषा बुडाला कि गावात पाणी येतं ,असे फक्त मी माझ्या अडतीस वर्षाच्या आयुष्यात दोन वेळेस बघितले ,नरषा बुडून गावात पाणी यायचे दिवस वाहूनच गेले ,वाईत मात्र पाणी येतं असं म्हणतात . तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींचा स्पर्श लाभलेलं मराठी विश्वकोशाचं कार्यालय दिमाखात उभं आहे ,अनेक जुनी घरं flat व्हायचे स्वप्न बघत आहेत . तिथून ८ किमी वर धोम धरण आहे आणि तिथे पोन्डीचेरी च्या समुद्राच्या रंगाचा सी ग्रीन रंगाचे पाणी आहे ,एका ठिकाणी अनंत आठवणी . मन मात्र पाण्याने काठोकाठ भरतं . परतीच्या सगळ्या वाटांवर तेच पाणी पसरलेलं जाणवतं .

Comments

Popular posts from this blog

रावी किनार्यावरून