Posts

Wai@ Glance वाई ला भेट द्यायचीच होती ,नद्यांचं आणि घाटा चं मला जन्मजात आकर्षण . नदीकाठी जन्म झाल्यामुळे ती संस्कृती माझ्या आतच भिनलेली ,तिला सोबत घेऊनच ,तिच्या  शोधात फिरत असते. आशुतोष गोवारीकर च्या स्वदेस मधील तो भव्य घाट लोभावणारा होता ही ,आशुतोष गोवारीकर ,प्रकाश झा ,रोहित शेट्टी ,इ अनेक चित्रपट दिग्दर्शकांना ही वाई चं आकर्षण वाटलेलं आहे . भल्या पहाटे हातात फक्त iphone आणि मनात नदीचं प्रेम घेऊन ते सगळं शोधत निघाले . माझं गंगाखेड्च पुन्हा नव्याने जुनं होऊनच भेटल्याचा प्रत्यय आला . तशीच जुनी आळी ,तशीच जुन्याचा अंश घेऊन नवी होऊ पाहणारी घरं आणि लफंगे गली कुचे . भव्यता लाभलेलं सुंदर गणपती मंदीर ,तो घाट ,गंगापुरी घाट ,समोर पसरलेलं पाणी ,पण नंतर भ्रमनिरास होतो ,तिथे कपडे धुणारी लोकं बघून ,ते या सगळ्या मनातल्या फ्रेम्स ची वाट लावतात . मला गंगाखेड चा घाट याहून कितीतरी मोठा आणि प्रचंड फोटोजेनिक वाटला ,तिथे अजून कुणाचे कसे लक्ष गेले नाही ?गंगाखेड ला नृसिंह देवाचे घाटावर मंदिर आहे ,नृसिन्हाला गावात प्रेमाने नरषा म्हणतात ,नरषा बुडाला कि गावात पाणी येतं ,असे फक्त मी माझ्या अडतीस वर्षाच्या आयु...

रावी किनार्यावरून

Image
रावी किनाऱ्यावरून …… हिमाचल प्रदेश च्या डलहौसी कडून चंबा ला जाणाऱ्या वाटेत रावी नदी लागते . रावी ची आमची भेट तशी अनपेक्षितच म्हणावी लागेल . पण त्यामुळेच मनातले किती आणि कुठले प्रवास जागे झाले त्याचा थांग लागत नाही . वाटा फुटेल तिकडे भटकण्याचा काळ सरकन निघून च गेला आयुष्यातून ,आता चे मार्ग फारच आखीव रेखीव आणि ठराविक वाटेने प्रवास करणेच झेपण्याचे झालेत . त्यामुळे आमचा हल्लीचा प्रवास बहुतांश पूर्वनियोजित ,वाचनातील संदर्भांच्या नोंदी घेत ,ऐकण्यात आलेल्या संदर्भांचे एकमेकांशी धागे जुळवत ,गुगल सर्च ची मदत घेत चाललेला असतो . नाही म्हणता मधेच प्रवासात कधीतरी अनवट नादाची वळणं येतात ,पण बदललेल्या comfort zone च्या प्राधान्यक्रमात तिकडे वळणं मात्र जमत नाही. तो अनवट नाद ,उधाणलेल्या वाटा  खुणावत राहतात पण त्यांना भिडणं मात्र जमत नाही ,इतक्या आपणच आपल्या वाटा अडवून बसलेलो असतो . म्हणूनच की काय ,वाटेत अवचित आलेल्या रावी च्या अनवट वळणाने माझा प्रवास कुठे कुठे नेला ,माझ्या ठराविक वाटात रावी च्या प्रवासाने स्वतःच्या किती आडवाटा मिळवल्या . .      डलहौसी चा...