Wai@ Glance वाई ला भेट द्यायचीच होती ,नद्यांचं आणि घाटा चं मला जन्मजात आकर्षण . नदीकाठी जन्म झाल्यामुळे ती संस्कृती माझ्या आतच भिनलेली ,तिला सोबत घेऊनच ,तिच्या शोधात फिरत असते. आशुतोष गोवारीकर च्या स्वदेस मधील तो भव्य घाट लोभावणारा होता ही ,आशुतोष गोवारीकर ,प्रकाश झा ,रोहित शेट्टी ,इ अनेक चित्रपट दिग्दर्शकांना ही वाई चं आकर्षण वाटलेलं आहे . भल्या पहाटे हातात फक्त iphone आणि मनात नदीचं प्रेम घेऊन ते सगळं शोधत निघाले . माझं गंगाखेड्च पुन्हा नव्याने जुनं होऊनच भेटल्याचा प्रत्यय आला . तशीच जुनी आळी ,तशीच जुन्याचा अंश घेऊन नवी होऊ पाहणारी घरं आणि लफंगे गली कुचे . भव्यता लाभलेलं सुंदर गणपती मंदीर ,तो घाट ,गंगापुरी घाट ,समोर पसरलेलं पाणी ,पण नंतर भ्रमनिरास होतो ,तिथे कपडे धुणारी लोकं बघून ,ते या सगळ्या मनातल्या फ्रेम्स ची वाट लावतात . मला गंगाखेड चा घाट याहून कितीतरी मोठा आणि प्रचंड फोटोजेनिक वाटला ,तिथे अजून कुणाचे कसे लक्ष गेले नाही ?गंगाखेड ला नृसिंह देवाचे घाटावर मंदिर आहे ,नृसिन्हाला गावात प्रेमाने नरषा म्हणतात ,नरषा बुडाला कि गावात पाणी येतं ,असे फक्त मी माझ्या अडतीस वर्षाच्या आयु...
Posts
Showing posts from May, 2019